डॉ वर्षा गंगणे लिखित पुस्तकाचे थाटात प्रकाशन

प्रहार टाईम्स| भुपेंद्र मस्के


गोंदिया: गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला वाणिज्य विज्ञान् महाविद्यालय देवरी येथे कार्यरत ,डॉ.वर्षा गंगणे लिखित” कोरोना परिणाम आणि आत्मनिर्भर भारत”या पुस्तकाचे नागपूर विद्यापीठाचे जॉईंट डायरेक्टर डॉ. संजय ठाकरे ,धोटे बंधू सायन्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या हस्ते शानदार प्रकाशन झाले. याप्रसंगी एम बी पटेल कला ,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय देवरीचे प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे तसेच लेखिका, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.वर्षा गंगणे उपस्थित होत्या. सदर पुस्तक लॉकडाउन एक या काळात लिहिले असून यात कोरोनाचा विविध क्षेत्रांवरील परिणाम यावर प्रकाश टाकला आहे. कोरोना काळात शासकीय मदतीचा उल्लेख आत्मनिर्भर भारत या भागात केला आहे.सदर पुस्तक बी ए अंत्य च्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.या पुस्तक प्रकाशनाबद्दल डॉ.वर्षा गंगणे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.यापूर्वी देखील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून काहींना राज्यस्तरीय पूरस्कार प्राप्त झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share