जय भीम च्या आवाजात साजरी झाली महामानवाची जयंती
प्रतिनिधी / सालेकसा
सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणी 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सालेकसा येथील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ओबीसी संघर्ष कृती समिती तर्फे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून जयंतीचे कार्यक्रम साजरे करण्यात आले याप्रसंगी ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे, जिल्हा सुरक्षा दल प्रमुख विजय फुंडे, तालुका अध्यक्ष मनोज डोये, तालुका महामंत्री रवींद्र चुटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
○गोटूल बहुउद्देशीय आदिवासी संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली गोटुल संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष वंदना मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी उद्घाटक म्हणून पवन पाथोडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून राहुल हटवार, वैभव खंडारे , सतीश अंभोरे, दिपाली फुंडे, तृप्ती चुटे, गोल्डी भाटिया, साक्षी मेश्राम इत्यादी मंडळी उपस्थित होती.
सालेकसा येथील टीचर कॉलनी येथे भारतरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संपूर्ण परिसरातील उपस्थित राहून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकरांच्या आवाजात संपूर्ण परिसर गाजून उठला. या प्रसंगी निखिल मेश्राम, ए बी बोरकर, बन्सोड सर, रामटेके सर, मडावी सर, कुंजाम सर, गणेश पटले, सुखदेव राऊत, सांगोडे सर, राहुल हटवार, गोल्डी भाटिया, छाया मेश्राम, माही मेश्राम, अनिता बोरकर, ज्योती बोरकर, मीना कुंजाम, रीना खोब्रागडे इत्यादी उपस्थित होते.