9 वी आणि 11 वी चे 37965 विद्यार्थी परीक्षेविणा पास…!
पुढच्या वर्गात प्रमोशन …. गुणवत्तेचे काय पालकामध्ये नाराजी
गोंदिया 15- 1ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्या नंतर आता 9 वी व 11 वी च्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे. गोंदिया जिल्हात 9 वी चे 19650 तर 11 वी चे 18315 असे एकूण 37965 विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आले आहे.
गोंदिया जिल्हात करोनाचे रुग्ण वाढ फपाट्याने होत असल्यामुळे 1 ली ते 8 वी व 9वी तसेच 11 वी च्या परीक्षा रद्द करून सरसकट पास करण्यात आले आहे. करोंनामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठा विपरीत परिणाम पडला असून पालकमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते सबंधित कमालीची नाराजी बघावयास मिळते. ऑनलाइन शिक्षणाला जिल्हात पालकांनी प्रतिसाद दिलेला नसून ग्रामीण भागात इंटरनेट ची सोय आणि पाहिजे तेवढी गती मिळत नसल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा शैक्षणिक नुकसान झाला हे चुकीचे ठरणार नाही. 1 वर्षपासून शाळा बंद पडल्या असून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान बघता पालकांची चिंता वाढली आहे.
शहरी विद्यार्थ्या बरोबर ग्रामीण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी , पालक संघटना , विद्यार्थी संघटनांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ऑफ लाइन परीक्षा घेण्याची मागणी केली होती परंतु करोंनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले आहे.