‘गृहभेट आपुलकीची’ उपक्रमांतर्गत देवरी तालुक्यात 744 पात्र लाभार्थी शोधले

डॉ. सुजित टेटे

देवरी 8: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत गोंदिया जिल्हाचे जिल्हाधीकारी दिपककुमार मीना आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या “गृहभेट आपुलकीची ” कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा विवृत्तीवेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत एकूण 744 पात्र लाभार्थी शोधले असून त्यांचे अर्ज भरण्यात आले .

सदर मोहीम जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत राबविण्यात आली असून 744 पैकी 738 प्रकरणे 31 मार्च 2021 रोजी मंजूर करण्यात आले आहेत .

सदर उपक्रमाच्या यशासाठी तहसीलदार विजय बोरुडे , सर्व नायब तहसीलदार , सर्व मंडळ अधिकारी , सर्व तलाठी , कलि राहुल चोपकर व आय टी सहाय्यक पंचम राऊत यांनी सहकार्य
केले.

सामाजिक अर्थ सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले लाभार्थी निदर्शनास आल्यास संबंधित तलाठी किंवा तहसिल कार्यालय देवरी यांना संपर्क करावा .
विजय बोरुडे , तहसीलदार देवरी

Share