Home Quarantine असलेल्या कोविड रुग्णावर गुन्हा दाखल

प्रहार टाईम्स

देवरी / चिचगड 8: चिचगड पोलीस ठाण्या अंतर्गत मौजा मुरमाडी येथे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशानुसार तहसीलदार विजय बोरुडे व यांच्या टीम सह गावातील पोलीस पाटील चेतनदास कुवरदादरा यांनी गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांना भेट देण्याकरिता गेले असता गावातील नामे – गजानन ब्रम्हालाल उईके (वय 37 वर्षे ) आपले घर सोडून बाहेर निघून गेल्याचे आढळून आल्याने स्वतःच्या व इतरांच्या जीविताला धोका निर्माण केल्यामुळे पोलीस पाटील उचेपूर यांच्या तोंडी तक्रारी नुसार अपराध क्र.49/2021 कलम 188, 269, 270 भादंवि अनव्ये चिचगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला .

कोविड नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करा सर्वांना विनंती करण्यात येते की कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
अटी शर्ती चे उल्लंघन केल्यास कडक कार्यवाही केली जाईल.”

-विजय बोरुडे तहसीलदार देवरी

Share