गोंदिया कोरोना: 576 नव्या रूग्णांची रेकार्ड ब्रेक नोंद
आज पाच रुग्णांचा मृत्यु; जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 207
प्रहार टाईम्स
गोंदिया 8: गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज जिल्ह्यात दुपारपर्यंत कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक विस्फोट होत जिल्ह्यात 576 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आजपर्यंत 18796 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. आज जिल्ह्यात 125 रुग्णांना कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तालुकानिहाय संख्या खालील प्रमाणे–
जिल्ह्यात आज 576 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया-303, तिरोडा-65, गोरेगाव-18, आमगाव-44, सालेकसा-04, देवरी-14, सडक अर्जुनी-68, अर्जुनी मोरगाव-54 व इतर- 06 रुग्ण आढळून आले.
३० वर्षीय,५३ वर्षीय, ६० वर्षीय व ४० वर्षीय रुग्ण राहणार गोंदिया यांचा शासकिय वैद्यकिय महाविदयालय गोंदिया येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला तसेच ६५ वर्षीय रुग्ण राहणार, गोंदिया यांचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध खाटांची संख्या-
जिल्ह्यात आज पर्यंत लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या-
जिल्ह्यात लसीकरण सुरू असलेल्या तालुकानिहाय केंद्राची माहिती खालील प्रमाणे-
कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात. त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9823254520, 9765090777, 9326811266, 8788297527 आणि 9823238057 यावर रूग्णांनी संपर्क साधावा. रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल एसएमएसद्वारे कळविण्यात येतो.