“देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या करोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेल्या”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘मन की बात’ मधे व्यक्त केले अनुभव

देशावर पुन्हा एकदा करोनाचं संकट घोंगावू लागले असुन पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. महाष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी ‘मन की बात’ केली. यावेळी मोदी यांनी लॉकडाउनच्या वर्षपूर्तीनिमित्त काही आठवणींनाही उजाळा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनच्या आठवणींना उजाळा दिला. मोदी म्हणाले, “गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल,” असं मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, “त्याचप्रमाणे करोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे सगळं करोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच करोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. मागील वर्षी आपल्यासमोर प्रश्न होता की, करोना लस कधी येणार? आता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकर मोहीम राबत आहे,” असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.

Print Friendly, PDF & Email
Share