होळीच्या पूर्वसंध्येला देवरी पोलिसांची 5 अवैद्य दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई

प्रहार टाईम्स

देवरी 28: पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या सूचनेनुसार देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी आपल्या टीमसह देवरी तालुक्यात होळीच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविली .

यावेळी देवरी येथील चीचगड चौकात विपीनकुमार बिलावर (४०) रा लालबहादूर नगर डोंगरगड हा दारू वाहतूक करीत असतांना झडती घेतली असता ३ नग ओसी ब्लू विदेशी दारू बंपर २१३०/- चा माल जप्त करून अपराध क्रमांक ६७/२०२१ कलम ६५ ई ७७अ महाराष्ट्र दारू कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

दुसरी कारवाई चुंनीलाल रामा नंदेश्वर (४८) रा मरामजोब आपले राहते घरी दारू विक्री करीत असतांना घराची झडती घेतली असता पिवळ्या रंगाचा पिशवीत इंपिरियल ब्लू ५ नग किंमत ७००/- चा माल मिळून आल्याने अपराध क्र ७८/२०२१ कलम ६५ई ७७अ नुसार महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

तिसरी कारवाई सुधोधन उर्फ सुधाकर फुलूक्के (35) रा धोबीसराळ यांच्या घराची झडती घेतली असता घरात स्वयंपाक खोलीत एक पिवळ्या रंगाचा पिशवीत २० नग देशी दारु १८०ml ने भरलेले किंमत १०४०/- चा माल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध अपराध क्र ६६/२०२१ ६५ई ७७अ महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

चौथी कारवाई विनोद बनसोड (४०) रा खुर्शीपार आपल्या अपना धाब्यावर अवैद्य दारू विक्री करतो अशी माहिती मिळताच ढाब्याची झडती घेतली असता एका कोपऱ्यात ३७ नग देशी दारू किंमत १९२४/- चा माल मिळून आल्यामुळे अपराध क्र ६९/२०२१ कलम ६५ई ७७अ नुसार देवरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.

पाचवी कारवाई जितेशकुमार मानावटकर (३३) रा शेंडा आपल्या मालकीच्या अंडा भुजीच्या दुकानात दारू विकतो अशा माहिती वरून झडती घेतली असता पिण्याच्या पाण्याच्या खोक्यात १२ नग देशी दारू ६२४/- किमतीची माल तसेच MH35V5393 गाडीच्या डिक्की मध्ये १ नग विदेशी दारू व जुने वाहन किंमत १५०००/- रु एकूण १५९०४/- चा माल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध देवरी पोलीस स्टेशन येथे अपराध क्र ७०/२०२१ कलम ६५ई ७७अ महाराष्ट्र दारू बंदी कायदा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया, जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अजित कदम, पो उप नि उरकुडे, पोहवा मडावी, पो ना देसाई, पोना बोहरे, पोना करंजेकर, पोना मस्के, पो शि हंसराज भांडारकर , पो शि हातझाडे, पो शि चव्हाण, पो शि नेवारे, चापोहवा राऊत यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share