महिला RFO दिपाली चव्हाण यांची स्वतःवर गोळी झाळून आत्महत्या….!!

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोट मध्ये नमूद…!

अमरावती /प्रतिनिधी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी ( RFO) यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत जिल्ह्यात घडली आहे तसे आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दि २५ मार्च ला सायंकाळी साडे सात वाजता ही घटना उघडकीस आली. या आत्महत्येने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे.

दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने चार पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात. रात्री-बेरात्री भेटायला बोलावतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे लिहिले आहे. यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेखही या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

दिपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. आपण गर्भवती असल्याने ट्रेक करु शकत नव्हती, तरी मुद्दामहून तीन दिवस मालूरच्या कच्च्या रस्त्याने फिरविले. यामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप देखील या नोटमध्ये महिला अधिकाऱ्याकडून करण्यात आला. काम केल्यानंतरही अनेक बिल काढली नसल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला. या आत्महत्येमुळे वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.

Print Friendly, PDF & Email
Share