अवैध दारू विक्रेत्यांवर देवरी पोलिसांची धडक कारवाई
नवीन ठाणेदार रुजू होताच अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले
देवरी २६: पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी गोपनीय माहिती मिळताच मौजा सालई येथील एक इसम नामे योगेश पुरणदास राऊत (४०) हा देशी दारू विक्री करतो या माहितीवरून त्याच्या घराची झडती घेतली असता राहते घराच्या माजघरात कापडी पिशवीत 180मिली च्या 6 नग देशी दारू किंमत 312/- चा माल बिनापरवाना मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र 64/2021 कलम 65ई, 77अ महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर ची कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया, जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, पो उप नि उरकुडे, पोना बोहरे, पो शि हंसराज भांडारकर, पो शि हातझाडे, पो शि रोशन डोहळे यांनी केली.