“अमुक तारखेला बँक बंद राहतील ” व्हायरल होणारा संदेश खोटा

प्रहार टाइम्स ने देवरी येथील केनेरा बॅंकच्या अधिकार्‍याशी चर्चा करून जाणून घेतले सत्य

देवरी 26- व्हाट्स अप्प वर काही दिवसापासून बँक अमुक अमुक तारखेला बंद राहतील असा संदेश व्हायरल होत आहे. त्यामुळे बँकेचे काम करणार्‍या ग्रामीण भागातील आणि इतर ग्राहकांनी बँकेत गर्दी वाढविली आहे.आपले काम पैशा विना आधुरे राहणार या भितीने ग्रामीण भागातील लोकांनी बँकेत कमालीची गर्दी केलेली दिसून येत आहे.

सदर व्हायरल होणार्‍या संदेशा बद्दल प्रहार टाईम्स ने देवरीतील केनेरा बँकचे अधिकारी विवेक पटले यांच्याशी चर्चा केली असता खालील माहिती प्राप्त झाली –

बँक सुरू बँक बंद
30 मार्च 27 मार्च
31 मार्च 28 मार्च
01 एप्रिल फक्त बँक अधिकारी व कर्मचारी29 मार्च
03 एप्रिल02 एप्रिल

व्हाट्स अप्प वर व्हायरल होणारा संदेश खोटा असून दिलेल्या तारखेला बँक सर्वांसाठी सुरू असणार , व्हायरल संदेशमुळे बँकेत अचानक गर्दी वाढलेली आहे. ग्राहकांनी गर्दी न करता दिलेल्या तारखेला आपले बँकेचे कार्य करावे, शक्यतो बँकेचे ऑनलाइन अप्प , नेट बँकिंग चा वापर करावा.” विवेक पटले सहाय्यक बँक व्यवस्थापक केनेरा बँक देवरी

Share