Breaking: धक्कादायक; जिल्हा परिषद हायस्कूल, आमगाव शाळेतील 15 विद्यार्थी एकाच दिवशी आढळले कोरोना पॉझिटिव्ह
अजून 45 विद्यार्थी व शिक्षकांचे अहवाल येणे बाकी
आमगाव 24: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची खळबळजनक माहिती आज समोर आली आहे हे सर्व विद्यार्थी एंटीजन तपासणीमधे आज कोरोनाग्रस्त आढळून आले. यापूर्वी इयत्ता 12 वी चा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला होता त्याच्याच संपर्कात आलेले विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शाळेतील एकूण 16 विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत.
एकाचवेळी शाळेतील सुमारे १४ विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्याने आरोग्ययंत्रणासुद्धा ‘अलर्ट’ झाली आहे. शहरातील जिल्हा परिषद शाळेत ५ वी ते १२ पर्यंत चे विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. या मध्ये तालुक्यातील जवळपास च्या गावातील विद्यार्थी शिक्षण घ्यायला आमगाव तालुक्यात येतात. सध्या १० वी व १२ चे विद्यार्थी शाळेत येत होते. मिळालेल्या माहितीनुसार या शाळेतील एका विद्यार्थ्यास कोरोना आजार झाला होता. त्यासाठी उपचार घेत होता, त्याचे संपर्कात आल्यानेच इतर विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती आहे. आज एकुण ऍन्टीजन कोरोना तपासणी झालेल्या 15 ते 18 वर्ष वयोगटातील 15 मुले पॉझिटीव्ह आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद चव्हाण व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिली आहे . या पैकी 14 विद्यार्थी इयत्ता 10 वी चे व 1 विद्यार्थी इयत्ता 12 वी चा आहे.
तसेच काही विद्यार्थी व शिक्षकांची आर टी पी सी आर तपासणी केली आहे त्यांचा अहवाल उद्या येणार असल्याचे सांगितले आहे . तालुक्यात कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण द्यावे व नागरिकांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स चे पालन करावे , आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, लक्षण दिसताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला असे आवाहन डॉ. विनोद चव्हाण तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.