राष्ट्रीय महामार्गावर ईको स्पोर्ट कारचा अपघात

वाहनाचे झाले मोठे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही

देवरी 25- राष्ट्रीय महामार्ग 6 वरील मरामजोब परीसरात आज सकाळी ईको स्पोर्ट MH 40 AC 7619 वाहनाचे मोठे अपघात झाले असून त्यामध्ये बसलेल्या नागपुर येथील रहिवासी पैकी 2 गंभीर जखमी तर 3 सुरक्षित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गंभीर व्यक्तींना गोंदियाला रवाना केल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून प्राप्त झाली.

प्रत्यक्ष दर्शीच्या सांगण्यानुसार डोंगरगड वरुण नागपुर कडे जात असलेल्या ईको स्पोर्टने ट्रकला ओवरटेक करतांना घटनेतील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्यावर 3-4 पलट्या मारल्यामुळे सदर अपघात झाल्याचे वृत्त आहे. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी गोंदिया ला हलविल्याची माहिती प्राप्त झाली. सदर घटनेचा तपास देवरी पोलिस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share