Breaking news – पोलिस कर्मचारी एसीबी च्या जाळ्यात

स/अर्जुनी २५: तालुक्यातील डुग्गीपार पोलिस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी संजय वडेट्टीवार यांच्यावर आज नुकतीच लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाच्या टीम ने कारवाई केली असे वृत्त आहे. सदर माहिती सूत्रांनी दिली असुन पोलिस विभागात खळबळ उडाली आहे, एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे, नेमका प्रकरण काय आहे हे कळू शकले नाही. लवकरच संपूर्ण वृत्त देण्यात येईल, मात्र या वृता मुळे पोलीस विभागाची पोलखोल झाली आहे. सध्या डुग्गीपार पोलीस स्टेशन मधे ही कारवाई सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email
Share