गंज लागल्याने कोसळलेला फवारा तात्काळ केला दुरुस्त

माहिती मिळताच मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी घटनास्थळाचा घेतला होता आढावा

देवरी 25: देवरी नगरीच्या सौंदर्यीकरणासाठी 2 वर्षापूर्वी कारगिल चौकात लावलेला पाण्याचा फवारा अचानक 24 मार्च च्या रात्री 6-7 वाजताच्या सुमारास कोसळला.

सदर घटनेची माहिती मिळताच देवरी चे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट घेऊन कोसळलेला फवारा दुरुस्त करण्याचे आदेश दिले. आज 25 ला दुपारी गंज लागून कोसळलेला फवारा तात्काळ दुरुस्त करण्यात आला आहे.

कारगिल चौकात स्थित सौंदर्यीकरण भर घालणारा फवारा सतत पाण्यात असतो त्यामुळे त्याच्या पायथ्याशी गंज लागल्यामुळे ते कोसळले होते त्यावेळी कुठलीही हानी झाली नसून ते पूर्वरत सुरू करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी प्रहार टाईम्स ला सांगितले.

Share