लायन्स क्लबच्या वतीने निशुल्क भोजनसेवा कार्यास शुभारंभ

प्रहार टाईम्स

देवरी २३: लायन्स क्लब देवरीच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ रूग्णांच्या नातेवाईका करिता “निशुल्क भोजन सेवा” या कार्याचे शुभारंभ रविवार(ता.२१ मार्च) रोजी पासून नियमीत करण्यात आले असून सदर उपक्रम हा लायन्स क्लब देवरीच्या सौजन्याने सुरु करण्यात आले आहे.


या “निशुल्क भोजन सेवा” कार्याचा शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबच्या चार्टर अध्यक्ष पिंकी कटकवार हे होत्या. या प्रसंगी नागपुर लायन्स क्लबचे डी.जी.एम.जे.एफ. संदीप खंडेलवाल, लायन्स क्लब गोंदिया चे व्ही.डी.जी. राजेंद्रसिंग बग्गा, लायन्स क्लब नागपुर चे पी.एम.सी.सी.एम.जे.एफ. राजे मधुजी भोसले, लायन्स क्लब गोंदिया चे एम.जे.एफ.कालूराम अग्रवाल, लायन्स क्लब गोंदिया चे राजेश्वर कनौजीया, झेड.सी. सारंग ढोक, देवरी ग्रामीण रुग्णलयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा फटिंग, सुनीता अग्रवाल,संजीवनी क्लब गोंदिया चे अध्यक्ष योजना कोतवाल, सचिव बरखा कनोजिया, राजेश कनोजिया , देवरी लायन्स क्लब च्या अध्यक्ष चरणजीत कौर भाटिया, सचिव, लक्ष्मीताई पंचमवार, कोषाध्यक्ष ज्योतीताई रामटेककर, क्लब चे सदस्य आफताब शेख , पारस कटकवार, अमृतपालकौर भाटिया, मनोज मेश्राम, पुष्पा धुर्वे, पूजा गहाने, सुधा अग्रवाल, हिवराज मेश्राम, स्वाती मेश्राम, सुमनताई बिसेन, उर्मिलाताई परिहार ,यांच्या सह नागपुर, गोंदिया व देवरी लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.


यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात क्लब द्वारे समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मल्टीपल क्लब च्या वतीने लायन्स क्लब देवरीच्या माजी अध्यक्ष पिंकी कटकवार यांना प्रमाणपत्र प्रदान करुण स्वागत करण्यात आले. तसेच लायन्स क्लब चे सदस्य तथा नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष आफताब शेख यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मल्टीपल क्लबच्या वतीने पिन भेट देवुन स्वागत व सत्कार केले.


दरम्यान लायन्स क्लबच्या च्या वतीने आयोजित “निशुल्क भोजन सेवा” कार्यास शुभारंभ देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णाच्या नातेवाईकांना अतिथिच्या हस्ते भोजन वाटप करुण करण्यात आले. ही निशुल्क भोजन सेवा दररोज सायंकाळी ६ ते ७ वाजे पर्यन्त सुरु राहणार आहे.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे सदस्य पारस कटकवार यांनी तर संचालन क्लबचे मल्टी मीडिया डिस्ट्रिक्ट चेयर पर्सन प्रतीक कदम यांनी आणि उपस्थितांचे आभार क्लबचे सदस्य आफताब शेख यांनी मानले.

Share