अवैद्य सट्टापट्टी घेणाऱ्यांवर देवरी पोलिसांची धडक कारवाई

अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले

देवरी 24: विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या सूचनेनुसार रेवचंद सिंगनजुडे ठाणेदार देवरी पोलीस स्टेशन देवरी आपल्या पोलीस स्टाफ सोबत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळताच देवरी येथील नंदकिशोर हरिशाम शाहू (33) रा देवरी दुकानात बसून मोबाईलवर सट्टापट्टी घेत आहे अशी माहिती मिळताच त्याची झडती घेतली असता मणिपूर, कल्याण, वरली मटका सट्टापट्टी,जुगाराचे हारजित चे खेळ व सट्टापट्टी घेतांना रंगेहात मिळून आल्याने विवो मोबाईल किंमत 3000रु व नगदी 1010रु माल मिळून आल्याने आरोपी नंदकिशोर शाहू रा. देवरी याच्या विरुद्ध अपराध क्र 62/2021 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक , अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक, जालंधर नागकुल उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, पोउपनि उरकुडे, पोहवा मडावी, पो ना बोहरे, पो शि भांडारकर, पो शि हातझाडे यांनी केली आहे.

Share