रस्ते व पुल दुरुस्ती विकास कामाकरिता १ कोटि ७ लाख ७४ हजाराच्या कामांना मंजूरी

आ. कोरोटे यांच्या प्रयत्नांना यश

देवरी २३ :महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबईच्या वतीने राज्याच्या २०२०-२१ या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा या तालुक्यात विविध रस्ते व पुल विशेष दुरुस्ती विकास दुरुस्ती विकास कामा करिता मंजूरी मिळाली असून या कामाकरिता १ कोटि, ७ लाख, ७४ हजार रूपयाची निधिची मंजूरी सुद्धा मिळाली आहे. या विकास कामाकरिता आमदार सहषराम कोरोटे यांनी शासन स्तरावर नियमित केलेले पाठपुरावा व प्रयत्नाला यश मिळाले आहे.


या मंजूर कामात जांभूरटोला – जामखारी – बिरसी – बोथली – ख़ुर्शीपर – तांडा या मार्गावरिल रोड दुरुस्ती व मोऱ्याची दुरुस्ती करिता ९ लाख ७५ हजार रुपये निधि तर नवरगांवकला – करंजी – मोहगांव – सुपलीपार-कट्टीपार या मार्गावरिल सीमेंट कॉक्रेट रोड ची दुरुस्ती व मोऱ्यांची दुरुस्ती करिता ७५ लाख ९९ हजार रूपयाची निधि तसेच दस्तोरा – ईरी – सुपलीपार – नंगपुरा रस्त्याचे सीमेंट कॉन्क्रेट रोड दुरुस्ती करिता ७ लाख रुपये अशा प्रकारे एकूण १ कोटि ७ लाख ७४ हजार रूपयाची निधि च्या विकास कामांना त्वरित सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार सहषराम कोरोटे यांनी दिली असून या सर्व विकास कामांकरिता शासन स्तरावर सतत केलेले पाठपुरावा व त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.


या विकास कामा बद्दल विधान सभा क्षेत्रातील सर्व जनतेनी आमदार कोरोटे यांचे अभिनंदन करुण त्यांनी केलेल्या प्रयत्ना बद्दल आभार मानले आहे.

Share