अवैध दारू विक्रेत्यांवर देवरी पोलिसांची धडक कारवाई

प्रहार टाईम्स

देवरी 23: पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या सूचनेनुसार रेवचंद सिंगनजुडे ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी यांनी आपल्या टीम सह देवरी हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन करीत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे कोहळीपार येथील रहिवासी झाडूराम उईके याला 2 लिटर किंमत 200 रु च्या मोहफुलच्या दारू सह पकडून अपराध क्र 58/2021 नुसार गुन्हा नोंद केला आहे.

दुसऱ्या कारवाई मध्ये शिवप्रशाद रामचंद शाहू देवरी येथील रहिवासी याच्या ढाबा मध्ये 6 नग देशी दारू किंमत 312 रु चा माल जप्त करून अपराध क्र 59/2021 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

तिसऱ्या कारवाई मध्ये प्रकाश बनसोड रा मुंडीपार मुरदोली यांच्या कडे 66 नग देशी दारू किंमत 3224 रु चा माल जप्त करण्यात आला असून अपराध क्र 60/2021 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई मध्ये विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया , जालंधर नालकुल उप विभागीय पो अधिकारी आमगाव अति कार्य देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सिंगणजुडे , पोउनि उरकुडे, पोह मडावी, पोशि देसाई, पो ना बोहरे, पो शि भांडारकर, हातझाडे, पो शि डोहाळे आणि राऊत यांचा समावेश आहे.

Share