मुख्यमंत्री सड़क योजने अंतर्गत देवरी तालुक्यात अनेक रोड रस्ते बाँधकामाचे शुभारंभ
आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते अनेक विकास कामाचे भूमिपूजन
देवरी, ता.२०: मुख्यमंत्री सड़क योजने अंतर्गत अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रात नवीन रोड-रस्ते व पुल बांधकामा करिता २० कोटी रूपयाची मंजूरी शासन स्तरावर देण्यात आली.अशा विकास कामाचे शुभारंभ गुरुवारी(ता.१८ मार्च) रोजी देवरी तालुक्यात करण्यात आले. या निमित्य देवरी तालुक्यातील अनेक गावातील रोड व रस्ते बांधकाम या विकास कामाचे भूमिपूजन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
यात देवरी तालुक्यातील पीतांबरटोला ते मासुलकसा या मार्गावर सीमेंट रोडाचे भूमिपूजन आमदार कोरोटे यांच्या हस्ते आणि सेरपार चे सरपंच गुनवंताताई कवास, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांन सह गाव परिसरातील बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले. तसेच कुंभारटोला ते सिरपुर/बांध या मार्गावरिल रस्त्याचे डांबरीकरन कामाचे भूमिपूजन आमदार कोरोटे यांच्या हस्ते आणि तालुका काँग्रेस चे अध्यक्ष संदीप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे देवरी शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, भर्रेगाव चे सरपंच लखनलाल पंधरे, सिरपुर/बांध चे सरपंच नितेश भेंडारकर, उपसरपंच जयन्द्र मेंढे, माजी सरपंच कलाबाई सरोटे, प्रल्हाद सलामे व योगेश साखरे यांच्या सह सिरपुर/बांध व भर्रेगाव परिसरातील लोकांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
त्याचप्रमाणे चिल्हाटी ते ककोडी या मार्गावर सीमेंट व डांबरीकरण रोडाचे भूमिपूजन आमदार कोरोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी चिल्हाटी चे सरपंच पुस्तकलाबाई मडावी, मुरमाडीचे सरपंच रामदेव सोटी, ककोडी चे सरपंच मिनाताई मडावी,उचेपुरचे सरपंच सेवंताताई गाहाणे, उपसरपंच रामजी हिरवानी, उपसरपंच भैयालाल जांभूळकर, ककोडी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उत्तम मरकाम, प्रतिष्ठित नागरिक सोनू साषर, डॉ. ब्रिजलाल सोनवाने, नरेंद्र शांडिल, अमरदास सोनबोईर, बबलू भाटिया, मधुकर उकनकर, पोलिस पाटील चंद्रशेखर शहारे, भगत केकती, मनीष मोटधरे यांच्या सह उचेपुर, चिल्हाटी व ककोडी परिसरातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.