हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात निलगायीचा मृत्यू
सदर घटनमुळे परिसरात भितीचे वातावरण
डॉ.सुजित टेटे
देवरी 22: तालुक्यातील ग्राम पंचायत सुरतोली अंतर्गत वनविभागाच्या कंपार्टमेंट 586 परिसरात नीलगाय मृत अवस्थेत असल्याची माहिती माजी उपसरपंच प्रदीप परिहार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
माहिती प्राप्त होताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृत निलगायी चा पंचनामा करण्यात आला.यावेळी बिट वनरक्षक ए. एम.अंबादे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
सदर घटना सकाळी 3-4 वाजता घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून बिबट प्राण्यांनी हल्ला केला असल्याचे संभाव्य अंदाज ए एम अंबादे वनरक्षक यांनी प्रहार टाईम्स ला सांगितले.
“निलगायीला कोणत्या प्राण्याने मारले हे सांगता येणार नाही, निलगायीचा पंचनामा करून जमिनीत पुरण्यात आले.”- महेश चोपडे (वन परिक्षेत्राधिकारी देवरी)