अर्थ संकल्पीय अधिवेशनात विधानसभा क्षेत्रातील २० कोटीच्या विकास कामांना मंजूरी

आमदार सहषराम कोरोटे यांच्या सततच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश

देवरी, ता.१९: महाराष्ट्र राज्याच्या सन २०२१-२१ या अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमगांव-देवरी या विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा या तिन्ही तालुक्यातील विविध विकास कामे यात नवीन पुल बांधकाम व रोड रुंदीकरण आणि डांबरीकरण अशा २० कोटि रूपयाच्या अनेक विकास कामांना मंजूरी मिळाली असून या कामाकरिता निधि सुद्धा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. या विकास कामांकरिता आमदार सहषराम कोरोटे यांनी शासनस्तरावर सतत केलेले प्रयत्न व पुढाकार घेवून केलेला पाठपुराव्याला यश मिळाले आहे.


या वर्षीच्या राज्य अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमगांव-देवरी या विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांना मंजूरी मिळाली असून या करिता निधि सुद्धा उपलब्ध करुण दिली आहे. यात सालेकसा। तालुक्यातील आमगांव-लोहारा-फुक्कीमेटा-तिरखेड़ी-पुराडा ते सिरपुर या मार्गावर नवीन पुल बाँधकामाकरिता ९० लाख रूपयाचे निधि तर देवरी तालुक्यातील मरामजोब-मासुलकसा-सिंगनडोह-पालान्दूर/जमी.-मगरडोह- घोगरा व केशोरी या मार्गावरिल नवीन पुल बाँधकामाकरिता १ कोटि ५० लाख रूपयाचे निधि तसेच भर्रेगांव राजमडोंगरी-परसोडी व ककोडी या मार्गावर नवीन पुल बाँधकामाकरिता १ कोटी ५० लाख रूपयाची विकास निधी मंजूर तर सालेकसा तालुक्यातील आमगांव(खुर्द)-तिरखेड़ी-पुराडा व फुक्कीमेटा या मार्गावर रोड रुंदीकरण आणि डांबरीकरण करिता ५ कोटी रूपयाची निधि तर देवरी तालुक्यातील कोटजांभोरा-लटोरी-नवेगांव-सोनपुरी-लाभानधारणी व लोहारा या मार्गावरिल रोड रुंदीकरण डांबरीकरण या कमाकरिता ४ कोटी रूपयाची विकास निधि व सालेकसा तालुक्यातील विचारपुर-गोर्रे-तिरखेड़ी या मार्गावरिल रोड रुंदीकरण व डांबरीकरण करिता ५० लाख रूपय निधि, तसेच अड़याल-दिघोरी-नवेगांव ते चिचगड या मार्गावरील रोड डांबरीकरण करिता ३० लाख रूपयाची निधी तर काटोल-सावनेर-आमगांव-सालेकसा ते राज्य सिमेपर्यंत च्या मार्गावर रोड डांबरीकरण करिता २ कोटी रुपये निधि. त्याचप्रमाणे काटोल-सावनेर-आमगांव-सालेकसा ते राज्य सिमेपर्यंत च्या मार्गावर डांबरीकरण करण्या करिता २ कोटि ४० लाख रूपयाची निधि. अशा प्रकारे विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यातील विविध विकास कामाकरिता एकूण २० कोटी रूपयाची निधी मंजूर करण्यात आली आहे.


या विकास कामांना मंजूरी मिळवून देण्याकरिता आमदार सहषराम कोरोटे यांनी शासन स्तरावर सतत प्रयत्न व पुढाकार घेवून पाढ़पुरावा केल्याने शेवटी राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात मंजूरी मिळाली आणि निधी उपलब्ध सुद्धा झाली. या कामात आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.या करीता विधानसभेतील सर्व जनतेंनी आमदार कोरोटे यांचे अभिनंदन करुण आभार मानले आहे.

Share