शिक्षक सहकार देवरीचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
“शिक्षकांचे कोणतेही प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित राहणार नाही“ – महेंद्र मोटघरे ( गट शिक्षणाधिकारी देवरी)
देवरी १८: शिक्षक सहकार संघटना तालुका देवरी तर्फे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्येविषयी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर भेटीत पुनःसर्वेक्षणात पालांदूर/जमी, ककोडी व मिसीपीरी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात करण्यात यावा, अपघात विमा रु 354 ची नामनिर्देशन ची नोंद शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत करण्यात यावी, सेवापुस्तकात नामनिर्देशनाची नोंद करण्यासाठी सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरून सूचित करावे,७व्या वेतन आयोगानुसार मंजूर झालेली वेतनश्रेणी व वेतनाची सेवापुस्तिकेतील नोंदी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि प गोंदिया यांचेकडून प्रमाणित करून घेण्यात यावी,देवरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षकांच्या दुय्यम सेवापुस्तिका बनविण्यासाठी/ अद्ययावत करण्यासाठी केंद्रानिहाय शिबीर घेण्यात यावे, सेवेची १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांनी चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रस्ताव सादर केले असल्यास पुढील कार्यवाहीसाठी त्वरित पाठविण्यात यावे, देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षण सेवकांच्या सेवापुस्तिका तयार करण्यात याव्यात, हिंदी- मराठी भाषा परीक्षा सूट मिळण्यासाठी ज्या शिक्षकांचे प्रस्ताव सादर केले असल्यास ते त्वरित पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावे.
वरील सर्व मुद्द्यांवर चर्चा आणि निवेदन देन्यात आले असुन गटशिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले तसेच शिक्षकांचे कोणतेही प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित राहणार नाही याची ग्वाही दिली. लवकरच दुय्यम सेवापुस्तिका तयार करण्यासाठी केंद्रानिहाय शिबिर लावले जाणार आहे, कोणत्याही शिक्षकांचे काम प्रलंबित राहणार नाही याकरिता वरिष्ठ लिपिक पालिवाल यांना निर्देशित केल्याची माहिती दिली.
सदर भेटीवेळी देवरी तालुकाध्यक्ष मोहन बिसेन, तालुका सचिव संदीप मेश्राम, जिल्हाउपाध्यक्ष नंदेश्वर कवास, जिल्हा सहकार्याध्यक्ष सुजित बोरकर, तालुकाउपाध्यक्ष चंद्रभान दशमेर , जिल्हामार्गदशक तिष्यकुमार भेलावे , जिल्हामार्गदशक चंद्रकांत लांजेवार , जिल्हा सल्लागार मनीष नागभीरे , जिल्हा सल्लागार नितिन कुंभरे , जिल्हाप्रसिद्धिप्रामुख महेंद्र रहांगडाले उपस्थित होते.