आता आपल्याला अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज(बुधवार) पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, “आपल्याला भीतीचे वातावरण नाही निर्माण करायचं. मात्र काही दक्षता बाळगून काही बाबतीत पुढाकार घेऊन, आपल्याला जनेतला संकटातून बाहेर देखील काढायचं आहे. आपल्या जुन्या प्रयत्नांचा समाविष्ट करून आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. अनेक राज्य अन्य राज्यांकडून नवनवीन प्रयोग शिकत आहेत. आता आपल्याला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. करोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी.”

तसेच, “जिथं आवश्यक आहे आणि हे मी ह आग्रहाने सांगतो की मायक्रो कंटेंनमेंट झोन बनवण्याच्या पर्यायत कोणत्याही परिस्थितीत हयगय होता कामा नये. यावर काम झालं पाहिजे. याशिवाय करोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावे.” असं देखील यावेळी मोदींनी सांगितलं.

“संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना कमीत कमी वेळात शोधून काढणं आणि आरटीपीसीआर टेस्ट ७० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.” असंही मोदी म्हणाले.

Share