पंचायत समितीचा ग्रामीण गृहनिर्माण कनिष्ठ अभियंता ACB च्या जाळ्यात

प्रहार टाईम्स

आमगाव 17: पंचायत समिती आमगाव येथील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पंकज श्रीराम चव्हाण, वय २८ वर्षे हे आज रू. ४,०००/- ची लाच स्विकारताना ACB च्या जाळ्यात रंगेहाथ अडकले.

सविस्तर असे की, तक्रारदार हे शेतकरी असुन सन २०१९-२० आर्थिक वर्षात ग्रामपंचायत खुर्शीपारटोला अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये त्यांचे चुकीचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्यावरून त्यांनी ऑनलाईन यादी तपासली असता त्या यादीत त्यांच्या नावाऐवजी त्यांच मुलाच्या नाव नोंदविल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी माहे जानेवारी २०२१ मध्ये श्री. चव्हाण कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती आमगाव यांची भेट घेवुन ऑनलाईन यादीमध्ये त्यांच्या नावाची दुरूस्ती करुन पहिली किश्त जमा करण्याची विनंती केली. त्यावेळी श्री. चव्हाण यांनी तकारदाराच्या नावात दुरूस्ती करवुन घरकुल बांधकामाची पहिली किश्त रू. २०.०००/- त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरीता त्यांच्याकडे रू,५,०००/- लाच रकमेची मागणी केली. दरम्यान श्री चव्हाण यांनी तकारदाराच्या बँक खात्यामध्ये घरकुल बांधकामाची पहीली किश्त रु.२०,०००/- जमा केली.

त्यानंतर काही दिवसाने श्री. चव्हाण हे घरकुलाच्या सर्वे करीता खुर्शीपारटोला येथे गेले त्यावेळी तक्रारदाराने त्यांना घरकुल बांधकामाची दुसऱ्या किश्त बाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, ऑनलाईन यादीतील नावाची दुरूस्ती करून पहिली किश्त जमा केल्याबाबतचे रू.५,०००/- तुम्ही आतापर्यंत दिले नाहीत, असे म्हटले. त्यावर तकारदाराने काही कमी करा अशी विनंती केली. त्यावर त्यांनी रू. ४,५००/- देवुन दया, घरकुलाच्या बांधकामाचे फोटो माझ्याकडे आणुन दिल्यानंतर मी दुसरी किश्त सुध्दा जमा करून देतो, असे म्हणुन तकारदाराकडे रु. ४.५००/- लाच रकमेची मागणी केली. तक्रारदारास गै. अ. श्री चव्हाण यांना लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी दि. १५.०३.२०२१ रोजी ला प्र. वि. गोंदिया येथे तक्रार नोंदविली.

लाच मागणीच्या योग्य पडताळणीअंती आज दि.१७.०३.२०२१ रोजी पंचायत समिती, आमगाव, जि. गोंदिया येथे लाचेचा सापळा रचण्यात आला. या यशस्वी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी श्री. पंकज श्रीराम चव्हाण, वय २८ वर्षे, पद-ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी), पंचायत समिती कार्यालय आमगाव, जि. गोंदिया यांनी आपल्या इतर लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन पंधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाच्या ऑनलाईन यादीमध्ये तक्रारदाराच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी, घरकुल बांधकामाची पहिली किश्त रू. २०.०००/- तकारदाराच्या बॅक खात्यात जमा केल्याचा मोबादला म्हणुन व दुसरी किश्त रु. ४५,०००/- तकारदाराच्या बँक खात्यात जमा करण्याकरीता तकारदाराकडे तडजोडीअंती रू. ४,०००/- लाच रकमेची पंचासमक्ष मागणी करुन ती लाच रक्कम स्वत: स्विकारली. त्यावरून आरोपीविरूध्द पो.स्टे. आमगाव, जि. गोंदिया येथे कलम ७ ला.प्र.का. १९८८ (सुधारीत अधिनियम २०१८) अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी श्रीमती रश्मी नांदेडकर, पोलीस अधीक्षक, श्री राजेश दुद्दलवार अपर पोलीस अधिक्षक, श्री मिलींद तोतरे, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, यांचे मार्गदर्शनात रमाकांत कोकाटे, पोलीस उपअधिक्षक, स.फौ विजय खोब्रागडे, पो.हवा. राजेश शेंद्रे, ना.पो शि. रंजीत बिसेन, नितीन रहांगडाले, सर्व लाप्रवि., गोंदिया यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share