जागतिक महिला दिनी सिलेगाव शाळेत महिला कोरोना योध्दांचा सत्कार

गोरेगाँव : जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा सिलेगाव तालुका गोरेगाव येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उषा रहांगडाले सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथि निशा बोदले केंद्रप्रमुख, कल्पना बिसेन उपाध्यक्ष शा. व्य. समिती रीना चंद्रिकापुरे दिव्या उईके, खोब्रागडे बाई शाळेचे मुख्याध्यापक कमलेश मेश्राम, टी वाय भगत, यू डी चकोले, एस आर साबळे यांच्या उपस्थिती पार पाडण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड 19 च्या नियमाचे पालन करून प्रतिमेच्या रूपात असलेल्या क्रांती ज्योती सावित्री बाई व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. या नंतर जागतिक महिला दिनी महिला कोरोना योध्दा यात आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका, सरपंच, केंद्राप्रमुख यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे शिक्षक सुंदरसिंग साबळे यांनी आजची स्त्री अबला कीं सबला आहे असे संबोधन केले. टी वाय भगत यांनी गाणे सादर केले. बोदले मँडम यांनी जुन्या परंपरा कश्या होत्या या विषयी माहिती दिली.महिला दिन साजरा का करावा याची गरज का निर्माण झाली विषयी विस्तृत मार्गदर्शन मुख्याध्यापक कमलेश मेश्राम यांनी केलं. तर कार्यक्रमाचे विषेश अतिथी दिव्या बाई उईके यांनी आपल्या गावाची शाळा नावारूपास आणण्यात शाळेतील शिक्षक यांनी खूप मेहनत घेतली आहे संबोधन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी महिला दिनानिमित्त सखोल माहीती दिली. कार्यक्रमाचे संचालन यू डी चकोले व आभार विद्यार्थिनी श्रध्दा रहांगडाले यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share