संस्थेच्या उत्पन्न लाभांशातून सभासदांना साहित्य वाटप

सालेगाव येथील साईबाबा मत्सपालन सह. संस्थेचा उपक्रम

देवरी ०९: तालुक्यातील सालेगाव येथील साईबाबा मत्सपालन सहकारी संस्थेच्या वतीने रवीवारी संस्थेची आमसभा घेवून संस्थेतील एकूण ६५ सभासदांना संस्थेला झालेले उत्पन्न लाभांशातुन बोनसच्या रुपात टिपिन डब्बे साहित्य वाटप करुण एक नवीन उपक्रम राबविला.


ही आमसभा संस्थेचे अध्यक्ष संजू उइके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी संस्थेचे सचिव गणराज नान्हे, उपाध्यक्ष घासले, संचालक भोगारे व इतर संचालकांसह संस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजू उइके यांच्या हस्ते संस्थेच्या ६५ सभासदांना संस्थेला झालेल्या उत्पन्न लाभांशातून बोनसच्या रुपात टिपिन डब्बे साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सचिव गणराज नान्हे यांनी तर उपस्थितांचे आभार संचालक भोगारे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share