महिलांचा सत्कार करुन शिवसेना महिला आघाडीने केला महिला दिन साजरा
देवरी 10- शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करुन या दिनाचे औचित्य साधून देवरी येथे शिवसेना गोंदिया जिल्हा महिला आघाडी जिल्हा कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कोरोना काळातील महिला योद्धांचा सत्कार करुन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडी जिल्हा कार्यालयाचे उद्घघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांचे हस्ते करण्यात आले. यप्रसंगी महिलांच्या सन्मानार्थ कु.दिव्या मडावी आणि कु.निशा रोकडे यांच्याद्वारे सादर केलेले सुंदर नृत्य कार्यक्रमाचे आकर्षक ठरले. आरोग्य सेविका पुष्पा नळपते, आंगनवाडी शिक्षिका वर्षा कावळे, आंगनवाडी सेविका सौ.शिवकांता चौव्हान, आशा सेविका सौ. ललिता पटले, महाराष्ट्र पोलीस सौ. प्रतिमा लेदे यांचा शिवसेना महिला जिल्हा आघाडी कडून साडी देवून सत्कार करण्यात आला.महिला दिनाचा कार्यक्रम सौ. सुनंदा भुरे यांचे अध्यक्षतेखाली व प्राचार्य सौ. रजिया शेख, शिवसेना महिला आघाडी गोंदिया जिल्हा संघटक सौ. करुणा कुर्वे, सौ.अनिता बोरुडे, शिवसेना जिल्हा उपसंघटक सौ.मायाताई शिवनकर, शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा, शहर प्रमुख राजा भाटिया, शिवसेना देवरी विधानसभा संघटक राजिक खान यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
शिवसेना कार्यालय नुसता नावासाठी असणार नाही या कार्यालयातून महिलांच्या समस्या सोडविण्याचा आणि महिलांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न केला जाईल तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. हे शिवसेना महिला आघाडीचे जनसंपर्क कार्यालय नाही तर जनसंवाद कार्यालय आहे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांनी उद्घघाटकिय भाषणातून व्यक्त केले. लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे तर जे आपण लिहिलं आणि वाचलं ते जिवनात अमलात आणणं खऱ्या अर्थाने शिक्षण होय असे मत सौ.सुनंदा भुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महिला आघाडी गोंदिया जिल्हा संघटक सौ.करुणा कुर्वे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी ढोमणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका संघटक सौ.प्रिती उईके, युवती सेना शहर संघटक कु.प्रिती नेवरगडे, प्रिती नेताम, सौ.सलमा राऊत, शिक्षक सेना देवरी तालुका अध्यक्ष अनिल कुर्वे, शिक्षक सेना देवरी शहर अध्यक्ष सुभाष दुबे, शिवसेना तालुका उपप्रमुख दालचंद मडावी, शिवसेना उपशहर प्रमुख महेश फुन्ने, क्रिष्णा राखडे, दिनदयाल मेश्राम, विलास राऊत, गणेश चंदेल, राजा गुप्ता, राजा मिश्रा, परवेज पठाण इ. शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.