निंबा येथील व्यायाम शाळेला साहित्य पुरवठा करा – जितेंद्र बल्हारे यांची मागणी

साहित्य पुरविन्याची आमदार सहसराम कोरोटे यांचे आश्वासन

राकेश रोकडे

सालेकसा 5:

सालेकसा तालुक्यातील निंबा येथे व्यायाम शाळेकरिता इमारत बांधकाम करण्यात आले. परंतु सदर इमारतीत कोणतेही साहित्य पुरवठा न केल्याने सदर इमारत पांढरा हत्ती बनून उभी आहे. त्यामुळे परिसरातील युवकांना व्यायामाकरिता कोणतेही साधन नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी निंबा परिसरातील युवकांनी जितेंद्र बल्हारे यांच्याकडे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. त्यावर जितेंद्र बल्हारे यांच्या मार्गदर्शनात आमदार सहसराम कोरोटे यांना निवेदनाच्या माध्यमातून निंबा येथे व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली गेली. त्यावर आमदार सहसराम कोरोटे यांनी लवकरच साहित्य उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे परिसरातील युवकांमध्ये उत्साह दिसून आले.

यावेळी जितेंद्र बल्हारे यांच्यासह खुशाल उपराडे, संदीप बिसेन, विनय ढेकवार, रवी कटरे, नितेश कटरे, महेंद्र गौतम, प्रवीण साखरे व मोठ्या संख्येत युवक उपस्थित होते.

Share