धानोली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुण जनसामान्यात असणे गरजेचे- विमल कटरे

सालेकसा 5:


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुण जनसामान्यांमध्ये विस्तारित व्हायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांनी राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून विमल कटरे यांनी धानोली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
तुकडोजी महाराज आश्रम धानोली च्या पटांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 52 वी पुण्यतिथी महोत्सव सोहळा साजर करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जि. प. सदस्या दुर्गा तिराले तर समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष विमल कटरे, उद्घाटक.पी.वी.R कंपनीचे इन्चार्ज. वेंकटस .कुमार.धानोलीचा.सरपंच ललिता भोई प्रमुख अतिथी ठाणेदार प्रमोदकुमार बघेले, उपसरपंच मुलाचंद सैयाम, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,पत्रकार बाजीराव तरोने, यशवंत शेंडे, ग्रा. प. सदस्य उषा कुरंजेकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी ,वन संरक्षण समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व गावातील महिला बचत गट पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटोचे मल्हार पण करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष शामु मेश्राम संचालन कृष्णकुमार पटले व आभार अभय कुरंजेकर यांनी मानले

Share