तंबाखूमुक्त समाज बनविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची महत्वाची भूमिका- सिमा सहषराम कोरोटे

प्रहार टाईम्स

नशामुक्त आणि तंबाखूमुक्त समाज याविषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला आणि निबंध स्पर्धेतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा आमदार कोरोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सत्कार

देवरी ५: आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या वाढदिवसा निमित्त 3 मार्च ला तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात सिमा सहषराम कोरोटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

प्राचार्य डॉ सुजित टेटे यांनी सीमा कोरोटे यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मान व स्वागत केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरिता थोटे यांनी केले.

तंबाखूमुक्त समाज बनविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची महत्वाची भूमिका असून समाजासाठी यांचा मोला चा वाट आहे त्यामुळे यांचा सन्मान झाला पाहिजे असे त्या यावेळी बोलत होत्या.

सदर स्पर्धेमध्ये वर्ग 5 ते 10 वी चे 130 विद्यार्थी सहभागी झाले असून तंबाकू मुक्त समाज यावर चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती केली .

यामध्ये चित्रकला स्पर्धेत श्रुती राठोड, श्रुतिका हुमने , मेघा तावाडे, संचिता शेंदरे, संस्कृती लांजेवार, चेतन रुखमोडे यांना सन्मानित करण्यात आला असून
निबंध स्पर्धेत गुंजन भांडारकर, जित ढवळे, प्राची आंबिलकर, आर्या रामटेके, रोहन मुंढे, गायत्री उके यांना सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला यशस्वीरूप देण्यासाठी ब्लॉसम पब्लिक स्कुल चे प्राचार्य डॉ सुजित टेटे, नितेश लाडे, विश्वप्रीत निकोडे, राहुल मोहूरले, सरिता थोटे वैशाली मोहूर्ले यांनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन सिद्धी थोटे आणि आभारप्रदर्शन गुंजन भांडारकर हिने मानले.

Print Friendly, PDF & Email
Share