तो वाहन चोर अखेर डूग्गीपार पोलिसांच्या ताब्यात..

पोलिसांनी नाकाबंदी व पाठलाग करून पकडला चोर

डॉ. सुजित टेटे

देवरी ७:

प्राप्त माहिती नूसार नागपूर येथून चोरी केलेला टाटा नेक्सन गाडीचे ट्रॅफिक पोलिसांची अपघात करून पसार झालेल्या आरोपीस वाहनासह दुग्गीपार पोलिसांनी नाकाबंदी व पाठलाग करून पकडले .

नागपूर येथे ट्राफिक पोलीस अमलदार यास धडक देऊन टाटा नेक्सन विना नंबरचे वाहन पसार झाल्याची माहिती श्री. विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया, सा. पोलीस अधिक्षक गोंदिया यांचेकडून श्री सचिन वांगडे ठाणेदार डुगीपार यांना प्राप्त होताच तात्काळ कोहमारा चौक येथे स्टॉप सह नाकाबंदी लावून वाहने चेक करतांनी रायपूर कडून संशयित वाहन कोहमारा चौक येथे आले व समोर पोलीस नाकाबंदी करीत असल्याचे पाहून संशयित वाहन चालक यांनी यु टर्न घेऊन देवरी कडे पसार झाल्याचे लक्षात येताच नाकाबंदी पाईट वरून पोलिस निरीक्षक सचिन वानखेडे व पोलीस नाईक यांनी खाजगी वाहन थांबवून त्या वाहनाने त्यांच्या पाठलाग केला असता संशयित आरोपी हा बाम्हनी खडकी गावाबाहेर रोडवर गाडी थांबवून जंगलाच्या दिशेने पळत असतांना त्याच्या पाठलाग करून चालक संदेश सिद्धार्थ भोईर वय 37 वर्षे राहणार शताब्दी नगर अजनी नागपूर व चोरीची टाटा नेक्सन गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व नागपूर पोलिसांना पुढील कारवाई करणे करिता माहिती दिली.

सदर कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया, सहाय्यक पोलिस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली श्री सचिन वांगडे ठाणेदार पोलीस स्टेशन पोलीस दुगिपार, हवालदार हरिसश्चंद्र शेंडे, पोलीस हवालदार जगदेश्वर बीसेन, पोलीस हवालदार रमेश हलामी, पोलीस नाईक झुमन वाडई, पोलीस शिपाई घनश्याम मुळे यांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share