गोठनगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा हल्ल्यात गुराखी ठार
प्रतिनिधी
अर्जुनी मोरगाव ०२- गोठनगाव वनपरिक्षेत्रात अंतर्गत आंभोरा बीट भाग 2, येथे वन्यप्राणी बिबट्याचा हल्ल्यात गुराखी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
वनपरिक्षेत्रातील आम्भोरा येथे लक्ष्मण गांडो भोगारे (7० ) हे गायीला जंगलात चरायला घेऊन गेले होते. त्यावेळी परतत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच 02/03/2021 का घटनास्थळी गोठनगाव परिक्षेत्र अधिकारी कु. डी. यू. पाटील व कर्मचारी दाखल झाले. पंचनामा, शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईक यांना देण्यात आला. दरम्यान, मृतकाच्या नातेवाइकांना शासनाकडून याथाशिघ्र नुकसान भरपाई देण्याची ग्वाही श्री पाटील सहायक वनसंरक्षक गोंदिया वनविभाग यांनी दिली. या घटनेने परिसरात वन्यप्राण्यांची दहशत पसरली आहे. वनक्षेत्रात बिबट्या तसेच इतर वन्यप्राण्यांचे वावर असल्यामुळे कुणीही एकटे, रात्री बेरात्री जंगलात जाऊ नये बाबत गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला, असून गस्त वाढविण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कु. डी. यू. पाटील दिली.