सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत नरहरी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

शैक्षणिक संस्कार आणि सामाजिक एकत्मता हेच समाजाच्या उन्नतीचे अंग आहे – प्राचार्य डॉ. सुजित टेटे

सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवरी येथे दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

देवरी २७: सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या ७०६ व्या पुण्यतिथीनिमित्त देवरी येथे पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुजित टेटे , सुखदेव कालबांधे, सहदेव कुर्वे, ताराचंद निनावे, दिलीप रोकडे, बालकृष्ण वडिकार, फाविंद्र हाडगे, कमला मस्के, करुणा कुर्वे , सरिता कावले, ममता रोकडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

शैक्षणिक , आध्यात्मिक संस्कार आणि सामाजिक एकात्मता समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असुन येणार्या पिठीला याची जाणिव करुण देने आपले कर्तव्य आहे असे प्रा. डॉ. सुजित टेटे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी समाजातिल जेष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन केले. सूखेदेव कुर्वे यांनी मंदिराला भेटवस्तु प्रदान केली. युवा सोनार समाजाचे जयेश मस्के, कौशिक रोकडे आणि शुभम निनावे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

अतिशय साध्या पद्धतीने सदर कार्यक्रम पार पडला असुन
कोरोनाचे नियम पाळुन मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला परिसरातील सुवर्णकार समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी ढोमने यांनी केले असुन कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सुभाष दुबे, अनिल कुर्वे , प्रमोद रोकडे, गुलाब निनावे आणि सुवर्ण सखी च्या अल्का दुबे , सरिता कावले, वैशाली टेटे आणि सर्व सदस्य यांनी केले असुन आभार प्रदर्शन ममता रोकडे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share