आमदार सहसराम कोरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त उदया भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी / सालेकसा

सालेकसा २: आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा येथे दि. ३ ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवा काँग्रेस सालेकसा तालुक्याचे महासचिव जितेंद्र बल्हारे जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव ओमप्रकाश लिल्हारे यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यासाठी केटीएस गोंदिया येथील रक्त संकलन चमूला आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच गोंदिया जिल्हा रुग्णालय येथील अधिष्ठाता सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पिपरिया क्षेत्रात रक्ताची नेहमी आवश्यकता असते व त्यासाठी वेळेवर रक्त उपलब्ध नसल्याने खाजगी रक्तपेढीतुन रक्त विकत घ्यावे लागते त्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणून शासकीय रक्तपेढीत रक्त उपलब्ध करून दिल्याने क्षेत्रातील जनतेस मोफत मध्ये रक्त पुरवठा करता येईल असे जितेंद्र बल्हारे यानी म्हणत जनतेला रक्तदान करण्यास आवाहन केले आहे.

कोरोना पासून स्वतःचा बचाव व स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय योजना या विषयावर अधिष्ठाता यांच्या माध्यमातून मार्गदर्शनही केले जाणार आहे.

जितेंद्र बल्हारे तसेच ओमप्रकाश लिल्हारे यांनी युवकांना तसेच रक्तदान करणाऱ्यास मोठ्या संख्येत उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share