घरकुल लाभार्थ्यांना जवळच्या घाटातून वाळू उपलब्ध करा- सुनील मिश्रा

देवरी तालुक्यातील घरकुल लाभर्थ्यांना शिलापूर , चुंबली आणि पिपारखरी वाळू घाटातून वाळू उपलब्ध करण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा व शिवसैनिकांनी तहसीलदारांना दिले निवेदन

प्रहार टाईम्स

देवरी -03 तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनतेला घरकुल मिळाले आहेत परंतु वाळू अभावी घरकुलांचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून घरकुल लाभार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या वर तनाव निर्माण झालेला आहे.

घरकुल लाभार्थ्यांना वाळूची नित्तांत आवश्यकता असून शासनाच्या निर्देशानुसार त्यांना 5 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत. त्या करिता जनतेच्या सोयी करिता नजीकच्या वाळू घाटवरून त्यांना वाळूची उपलब्धता करून देण्यात यावी तसेच 10 हजार विटा बनविण्यास परवानगी देण्यात यावी असे निवेदन सुनील मिश्रा शिवसेना तालुका प्रमुख देवरी यांनी तहसीलदर विजय बोरूडे यांना केले आहे.

यावेळी संघटन प्रमुख राजीक खान , महिला आघादी संघटिका करुणा कुर्वे, शहर प्रमुख राजा भाटिया , प्रीती नेवरगडे , प्रीती नेताम , दिलीप राऊत , कृष्ण राखडे , महेश फुन्ने , सलाम राऊत आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Share