किती शेतकऱ्यांचे जीव घेणार महावितरण? महावितरणच्या शेकडो योजनांनंतरही शेतकऱ्यांच्या ललाटी अंधारच!

प्रहार टाईम्स | भुपेन्द्र मस्के

गोंदिया २३: शेतकऱ्यांनी पैसे भरूनही वीजजोडणी देता आली नसल्यामुळे महावितरणच्या चुकांमुळे नाहक बळी ठरला ओमप्रकाश हरिभाऊ वाढई पळसगाव ( चु).ता. देवरी जिल्हा गोंदिया येथील शेतकरी. शेतकऱ्यांना लवकरात लवकर वीजजोडणी मिळावी,यासाठी गाजावाजा करून अनेक योजनांची घोषणा केली. प्रत्यक्षात अजूनही कृषीपंपांची वीज जोडणी पूर्ण झालेली नसल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी अंधारच असल्याचे दिसत आहे. व आता पाळी आहे गळफास लावण्याची.

कृषीपंपासाठी पैसे भरूनही वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. तर देवरी तालुक्यात तीच संख्या ५५० च्या वर आहे.
शेतकऱ्यांचा वाढता दबाव तसेच त्यावरून होणारे राजकारण पाहता महावितरणने अनेक योजनांची घोषणा केली. उच्चदाब,लघुदाब वितरणप्रणाली, अटल सौरपंप कृषी योजना तसेच मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनांचा यात समावेश आहे. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2018 या कालावधीत “पेड पेन्डींग’असलेल्या कृषीपंपांना जोडणी देण्यासाठी उच्च दाब,लघूदाब प्रणाली (एचव्हीडीएस) राबविण्यात आली. याच काळात अटल सौरपंप योजनाही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. पोलचे अंतर, पेड पेन्डींग लीस्ट क्‍लियर करण्यासाठी लागणारा वेळ त्याला कंटाळून शेतकऱ्यांनी सौरपंपाला प्राधान्य दिले. बऱ्याच शेतकऱ्यांनी सौरकृषी पंपांची जोडणी केली.

देवरी तालुक्यात मार्च २०१८ पासुन महावितरणच्या आर्थिक समस्येमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीजपंपासाठी जोडणी पोहोचलेली नाही. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही वीज जोडणी मिळालेली नाही. या काळात दोन सरकारे बदलली. प्रत्येक वेळी वीजजोडण्या पूर्ण केल्या जातील अशी आश्‍वासने देण्यात आली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्‍शन मिळालेले नाही. परिणामी पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना रामभरोसे रहावे लागत आहे.
पावसाळी हंगाम कसाबसा निघुन जातो. पण् पुर्वीपासून कर्जाच्या डोंगराखाली असणारा शेतकरी आर्थिक सुबत्तेकरिता रब्बी हंगामात धान पिक लावण्याचे स्वप्न महावितरणने करपविलेले दिसत आहे. शेतकऱ्यांना कायम वीज जोडणीच्या प्रतीक्षेत राहावे लागणार आहे.या धोरणामुळे किती शेतकऱ्यांचे जीव घेणार महावितरण? व सरकार? शेतकऱ्यांचे सरकार म्हणविणाऱ्या राजकारणी खासदार- आमदारांना जाब विचारण्याची हिंमत शेतकऱ्यांत दिसून येत नाही हि क्षेत्रातील जनतेची मोठी समस्या आहे.

वीज जोडणी मिळत नसल्याने देवरी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी वैतागले आहेत. हे उल्लेखनीय.

Print Friendly, PDF & Email
Share