तरुणांनी कबड्डी सारख्या स्वदेशी खेळांना अंगीकारावे- आ. कोरोटे

दर्रोटोला (भर्रेगांव) येथे प्रौढ़ कबड्डी स्पर्धेचे आयोजन

देवरी १७: आपल्या देशात अनेक स्वदेशी खेळांचा उगम झाला आहे. अशा खेळांतून शारीरिक व्यायाम व शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे होत असल्याने अशा स्वदेशी खेळांना आज महत्व आहे परंतु धावत्या युगात मैदाने ही ओस पडतांनी दिसू लागली आहे. त्याचे कारण म्हणजे आज ची तरुण पीढ़ी आपल्या हातात मोबाईल घेवून तासमतास घरात एकच ठिकाणी बसु लागली आहे. त्यामुळे याचा दुष्परिणाम सुद्धा लगेच दिसायला लागले आहे. तरुण पीढ़ीचे मेंदू हे दगड़ व शरीर अस्त-व्यस्त होत आहे. परंतु दर्रोटोला येथील तरुणांनी प्रौढ़ कबड्डी स्पर्धा येथे आयोजीत करुण या भागातील तरुण पिढीला एक संधी उपलब्ध करुण दिली त्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो. कबड्डी सारखे खेळ खेळण्याकरिता ताकत, हिम्मत व कौशल्य लागतो ह्या सार्व गोष्टी या भागातील तरुणांमध्ये आहे. त्यामुळे येथील तरुणांनी कबड्डी सारख्या स्वदेशी खेळांना अंगीकारावे असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.


आमदार कोरोटे हे देवरी तालुक्यातील दर्रोटोला(भर्रेगाव) येथे आदिवासी नवयुक्त क्रीड़ा मंडळाच्या वतीने रविवार(ता.१४ फेब्रुवारी) रोजी आयोजीत एक दिवसीय प्रौढ क्लोज कबड्डी स्पर्धेत उदघाटक च्या रुपात बोलत होते.


या स्पर्धेचे उदघाटन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि देवरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली पर पडले. या प्रसंगी तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, भर्रेगाव चे सरपंच लखनलाल पंधरे, तंटामुक्ति समिति चे अध्यक्ष नामदेव आचले, माजी सरपंच विघाताई खोटोले, माजी उपसरपंच मनोज मिरी, ग्रा.पं. सदस्य संगीताताई दर्रो, नंदू नेताम, योगराज साखरे, रिताबाई सलामे, जयंद्र मेंढे. मदन रहिले, अरविंद शेंडे, सूरजलाल उसेंडी, एकनाथ राऊत, प्रल्हाद सलामे, तुकाराम पंधरे, मुन्नीबाई उसेंडी, पंकज शहारे यांच्या सह दर्रोटोला-भर्रेगाव परिसरातील अनेक क्रीड़ा प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.


या स्पर्धेचे प्रास्ताविक नामदेव आचले यांनी तर संचालन खुशाल कुंभरे यांनी आणि उपस्थितांचे आभार प्यारेलाल वर्चो यांनी मानले.

Share