देवरीत गारपिट व अवकाळी पावसाची हजेरी

प्रहार टाईम्स

देवरी तालुक्यात गुरुवारी सकाळी 2.45 वाजताच्या सुमारास गारपीट झाली. त्यानंतर सकाळी 2.50 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

देवरी १८: हवामान विभागाने १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता.गुरुवारी सकाळी 2.45 दरम्यान पावसाला सुरुवात झाली. तालुक्यात काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला.


गोंदिया जिल्यातील देवरी तालुक्यात गुरुवारी सकाळी 2.45 वाजताच्या सुमारास गारपीट झाली. त्यानंतर सकाळी 2.50 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर अवकाळी पावसामुळे धान खरेदी केंद्रावर उड्यावर असलेल्या धानाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share