कबड्डीच्या माध्यमातून देवरी पोलिसांचा सामाजिक उपक्रम

गोंदिया पोलिस विभागाअंतर्गत देवरी पोलिसांचा अभिनव उपक्रम

डॉ. सुजित टेटे

देवरी १९: पोलिस विभाग गोंदिया द्वारा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांचा कबड्डी खेळातिल उत्साह वाढविण्यासाठी कबड्डीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

सदर कार्यक्रमामधे प्रमुख अतिथी म्हनून पो स्टे. देवरीचे पोलिस निरीक्षक अजित कदम, PSI उरकुड़े ग्रा प सेरपार चे सरपंच, पोलिस पाटिल, यांच्यासह विभागातिल कर्मचारी उपस्थित होते.

सदर उपक्रमामधे एकुण ८ चमू सहभागी झाले असुन त्यामधे दर्रोंटोला, सेरपार, चारभाटा, सिलापुर, टेकाबेदर, चिचेवाडा, मरामजोब आदि गावातिल चमू उपस्थित होत्या.

यामधे दर्रोंटोला प्रथम क्रमांक आणि चिचेवाडा द्वितीय आले असुन दोन्ही चमूची निवड जिल्हास्तरीय सामन्यासाठी करण्यात आली आहे.

सदर सामाजिक उपक्रमाच्या यशासाठी पो.ह. मड़ावी, ना.पो.शि. बोहरे , पो.शि. कांदे आणि इतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें