देवरी येथे विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सोहळा
गावांच्या विकास कार्यात सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे- आमदार कोरोटे
प्रहार टाईम्स
देवरी १९: देवरी येथे बुधवारी (ता.१७ फेब्रुवारी) रोजी आमदार कोरोटे यांच्या निवासस्थानी आयोजीत आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सहषराम कोरोटे , गोंदीया जिल्हा काँग्रेस चे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, प्रदेश प्रतिनिधी राजेश नंदागवळी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई शहारे, जि.प.च्या माजी सभापति लताताई दोनोडे, तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, सालेकसा चे तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, आमगांव चे तालुकाध्यक्ष संतोष बहेकार, महेश ऊके, सामाजिक कार्यकर्ता सीमाताई कोरोटे, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवारम, कुलदीप गुप्ता, बबलू कुरैशी यांच्या सह विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे सर्व सेल चे पदाधिकारी, कार्यकर्ता, सरपंच व उपसरपंच बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी, वासुदेव चुटे, लताताई दोनोड़े. उषाताई शहारे, महेश ऊके ओमप्रकाश रामटेके आदिंनी समायोचीत मार्गदर्शन केले.
दरम्यान कांग्रेस पक्ष समर्थीत देवरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायत चे सरपंच व उपसरपंच तर आमगांव तालुक्यातील ४ ग्रा.पं.चे आणि सालेकसा तालुक्यातील ५ ग्रा.पं.चे सरपंच व उपसरपंच असे एकूण ३० ग्रा.पं. चे सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार शाल,. श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन आमदार कोरोटे व उपस्थित अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी तर संचालन सचिन मेळे यांनी आणि उपस्थितांचे आभार विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नरेश राऊत यांनी मानले.