भाजपाची सरपंचा भारती सलामे यांचा काँग्रेसमधे प्रवेश

देवरी २० : तालुक्यातिल ग्रा प केशोरी चे सरपंचा सौ.भारतीताई केवळराम सलामे भारतीय जनता पार्टी सोडून काँग्रेस पक्षात आमगावदेवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.सहसरामजी कोरोटे यांच्या कार्य शैलीवर विश्वास ठेवून कोरोटे भवन देवरी येथे भारतीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले यावेळी संदिप भाटीया अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी देवरी, कविताताई वालदे सरपंच गडेगाव, बाळीरामजी कोटवार महासचिव काँग्रेस कमेटी , छगणलालजी मुंगणकर,मा.ब्रह्माजी अरकरा, भीमराव वालदे, धनिष अरकरा, अरविंद उके व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Share