भर्रेगाव ग्रामपंचायत : सरपंचपदी लखनलाल पंधरे तर उपसरपंचपदी जयेंद्र मेंढे
देवरी : तालुक्यातील असलेल्या भर्रेगाव ग्रामपंचायतमध्ये आज शुक्रवार, दि.12 रोजी घेण्यात आलेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत लखनलाल तूळशिराम पंधरे सरपंचपदी तर जयेंद्र काशीराम मेंडे हे उपसरपंचपदी निवडून आले.
तालुक्यात 12 फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदांसाठी निवडणुका होत आहेत. 09 सदस्य असलेल्या भर्रेगाव ग्रामपंचायतमध्ये आज निवडणूक अध्यासी अधिकारी के आर चौधरी यांनी सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेतली. सरपंच लखनलाल तूळशिराम पंधरे पदासाठी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर उपसरपंच पदासाठी जयेंद्र काशीराम मेंढे व विद्याताई सुरेंद्र खोटेले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक हात वर करून घेण्यात आली. सरपंच पदासाठी लखनलाल पंधरे यांना सहा मते मिळाली तर उपसरपंच पदासाठी जयेंद्र मेंढे यांना पाच तर विद्याताई खोटेले यांना दोन मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अध्यासी अधिकारी के आर चौधरी यांनी लखनलाल पंधरे यांना सरपंचपदी निवडून आल्याचे घोषित केले तर जयेंद्र मेंढे यांना उपसरपंचपदी निवडून आल्याचे घोषित केले.
शांततेत पार पडलेल्या सरपंच-उपसरपंच निवडणुकीवेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून के आर चौधरी यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. यावेळी सि आर चाचेरे ग्रामसेवक, योगराज महादेव साखरे,रिताबाई सलामे,संगीता दर्रो,नंदलाल नेताम, मोहन कोचे परिचर, प्रमोद मडावी, रेवचंद खोटेले, आणि ग्रामवासी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचाचे गावकर्यांनी अभिनंदन केले.