मुंबई येथे आमदार कोरोटे हे ग्रेट इंडियन पुरस्काराने सम्मानित

कोरोना विषाणुच्या काळात क्षेत्रातील लोकांना सहकार्य केल्याबद्दल सन्मान

देवरी 10: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी कोरोना विषानुच्या संसर्गकाळात आपल्या विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहून त्यांना अन्नधान्य व आर्थिकरित्या उत्तम लोकप्रतिनिधि च्या रुपात मदत केली. यांच्या या कार्याची दखल माजी खासदार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे प्रवक्ता डॉ. उदित राज व बुद्धा क्रिएशन ऑफ इंडिया सिनेमा(पी.सी.आय.सी) यांनी संयुक्त रित्या घेवून आमदार कोरोटे यांची ४ थ्या ग्रेट इंडियन पुरस्कारा करिता निवड करुण, रविवार(ता.७ फेब्रूवारी) रोजी मुंबई येथील होटल रामादा प्लाजा वाम ग्रोव जूहु बिच येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळयात आमदार सहषराम कोरोटे यांना ग्रेट इंडियन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.


हा पुरस्कार माजी खासदार तथा काँग्रेस चे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. उदित राज यांच्या वाढदिवस ७ फेब्रुवारी रोजी दरवर्षी न्याय दिवसच्या रुपात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन हा ग्रेट इंडियन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. या प्रसंगी देशात विविध क्षेत्रात उत्कृष्ट रित्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिंन्ना या ग्रेट इंडियन पुरस्काराने सम्मानित केला जातो.

मुंबई येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळयात माजी खासदार तथा काँग्रेस चे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. उदित राज यांच्या हस्ते आणी भारत सरकारच्या मुख्य आयकर आयुक्त सीमा उदित राज व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष तथा माजी खासदार हुसेन दलवई यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार कोरोटे यांना सम्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार (७ फेब्रुवारी )रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.


आमदार सहषराम कोरोटे यांचा ग्रेट इंडियन पुरस्काराने सम्मान केल्याबद्दल विधानसभा क्षेत्रातील सर्व काँग्रेस चे पदाधिकारी. कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व सर्वसामान्य जनतेनी अभिनंदन केले आहे.

Share