शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी रुग्णांना केले फळ वितरण

देवरी 10: शिवसेना महिला आघाडी यांनी नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वितरण करून रुग्णा विषयी आपुलकी दाखविली.

सविस्तर वृत्त असे की गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी द्वारे फळ वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर देवरी येथे सदर उपक्रम उत्साहात पार पडला असून यावेळी रुग्णाच्या समस्या चा आढावा घेण्यात आला आणि रुग्णांनी सुद्धा या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी गोंदिया जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका करुणा कुर्वे , शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने तालुका अध्यक्ष अनिल कुर्वे, शहर प्रमुख राजा भाटिया, देवरी वि स संघटक राजीक खान, तालुका संघटिका प्रीती उईके, शिक्षक सेना शहर अध्यक्ष सुभाष दुबे, महेश फुंने, सचिन भांडारकर, प्रीती नेताम , चेतन जंजाळ, राजा गुप्ता आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Share