इंडिका कारच्या धड़केत तिन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

स. अर्जूनी १०:

आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील 03 विद्यार्थ्यांचा अपघात होऊन मरण पावले. सकाळी सदर शाळेतील इयत्ता 11 वी चे 03 विद्यार्थी शाळेत येत असतांनी खजरी जवळ गोंदिया कडे जाणाऱ्या टाटा इंडिका कार ने जबर धडक दिली असता मुंढरीटोला व मुरदोली येथील प्रत्येकी 01 विद्यार्थी जागेवरच मरण पावले आणि डव्वा 01 विद्यार्थी सहयोग हॉस्पिटल गोंदिया येथे 01 मृत्यू पावला. मृतकांचे नाव 1) तुषार ब्रिजलाल शिवनकर मु.मुरदोली, (11 वी कला) 2) शुभम नंदकुमार भिमटे मुंढरीटोला , (11वी विज्ञान)
3) प्रविण सतोश कटरे डव्वा. (11वी विज्ञान) सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Share