C-60 पोलीस दलात कार्यरत संतोष चव्हाणची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

महाराष्ट्रातून 18 वा

सालेकसा ११:
नुकत्याच 10 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असुन यात C-60 पार्टी सालेकसा पोलिस दलात कार्यरत संतोष रामा चव्हाण यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड करण्यात आली असून त्यानी खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्रातून 18 वा रँक प्राप्त करीत घवघवीत यश संपादन केले आहे.

संतोष चव्हाण हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहीवाशी आहेत. त्यांचे बी.कॉम डी.एड पंर्यतचे शिक्षण घेतले असुन ते प्रामाणिक, होतकरू मेहनती ,जिद्दी, व आपले कार्य निष्ठापूर्वक करणारे आहेत पोलीस दलातील त्याची 10 वर्षाची सेवा झालेली आहे त्यांनी आपल्या यशाचे प्रथम श्रेय मोठे वडील प्रताप चव्हाण, वडील-रामा चव्हाण, आई-दुर्गाबाई चव्हाण, पत्नी-विद्या चव्हाण, मुलगी आरोही चव्हाण, आयुष अकैडमीचे संचालिका सौ.सुषमा माने, प्रा.विनोदकुमार माने, गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय तेजेन्द्र मेश्राम यांना दिले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 24 डिसेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित स्पर्धा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल 10 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत राज्यभरातून पोलिस दलातील 4529 उमेदवार बसले होते. त्यापैकी 1451 उमेदवार शारीरिक चाचणी करीता पात्र ठरले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share