देवरी : तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाला स्थानिक पी.एम.श्री. जि. प. हायस्कूल देवरी येथे आज मंगळवार दिनांक 7 पासून सुरुवात झाली. यावेळी महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी, प. स. देवरी यांच्या मार्गदर्शनात ओमप्रकाश ढवडे विस्तार अधिकारी, धनवंत कावळे, गटसमन्वयक, राजेंद्र खोब्रागडे, मूल्यवर्धन तालुका समन्वयक , दिपक कापसे ,मुख्याध्यापक पीएमश्री हायस्कूल देवरी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
प्रशिक्षणाच्या प्रास्ताविकेतून श्री लोथे, तालुका समन्वयक यांनी मूल्यांबद्दलची पार्श्वभूमी सांगून प्रशिक्षणाचे नियोजन कसे आहे याची माहिती दिली. श्री ढवळे यांनी मूल्यवर्धन आपल्याला किती आवश्यक आहे व मूल्य कशी रुजतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. श्री कावळे यांनी मूल्यवर्धन प्रशिक्षणाचे नियोजन कसं आहे व विद्यार्थ्यांना किती आवश्यक आहे तसेच प्रशिक्षणाचे महत्त्व काय आहे याबाबत मार्गदर्शन केले. श्री खोब्रागडे यांनी मूल्यवर्धन विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजवावे पाठ्यपुस्तकाचा गाभा घटक त्याचा वापर याबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला ९ सुलभक असून जवळपास १५० प्रशिक्षणार्थी असून प्रशिक्षणाला थाटात सुरुवात करण्यात आली.









