महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसील संघटनेचा सामूहिक रजा आंदोलन

गोंदिया 2: यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील वैभव पवार नायब तहसीलदार आपल्या शासकीय कर्तव्यावर असतांना जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुजोर रेती माफिया वर अटकेची कारवाई झाली असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आंदोलन पुकारले आहे आणि त्या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून सर्व सदस्यांनी आज 2 फेब्रुवारी ला सामूहिक रजा आंदोलन केले.

वैभव पवार नायब तहसीलदार उमरखेड यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ उपजिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना सामूहिक रजा आंदोलनाचे निवेदन दिले असून दोषी वर कारवाई ची मागणी सदर निवेदनातून केली आहे.

सदर आंदोलनामध्ये वंदना सवरंगपणे SDO गोंदिया , जयराम देशपांडे RDC गोंदिया, विजय राऊत उप जि EGS, प्रशांत घोरुडे तहसीलदार तिरोडा, विजय बोरुडे तहसीलदार देवरी, डी एस भोयर तहसीलदार आमगाव, धनंजय देशमुख, रामकृष्ण कुंभरे, लीना फलके , पि.एस शिंदे, अरुण भुरे, ओंकार ठाकरे, यांच्या सह संघटनेचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share