सिटीझन कॉर्नर टॅबमध्ये कंप्लेट सुविधा, पोलिस दलाची नवीन वेबसाईट

गोंदिया:  जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या पोलिस दलाविषयी अद्ययावत माहिती व ऑनलाईन तक्रार व तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यांनंद झा यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्हा पोलिस दलाची नविन वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली आहे.

वेब साईटवर गोंदिया जिल्हा पोलिस दलाची अद्यावत माहीती तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन, शाखांची माहीती अद्यावत उपलब्ध करण्यात आली आहे. नागरीकांना पोलिस विभागाशी संबंधीत आवश्यक माहीती याद्वारे मिळणार आहे. या वेबसाईटवर सिटीझन कॉर्नर टॅबमध्ये प्रथमच ऑनलाईन कंप्लेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केलेल्या तक्रारींवर संबंधीत पोलिस स्टेशनतर्फे कारवाई होणार आहे.  जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या पोलिस दलाविषयी अद्ययावत माहिती व ऑनलाईन तक्रार व तक्रारीचे  त्यासोबतच कोणत्या नागरीकाने काय तक्रार केली व त्या तक्रारीवर संबंधीत पोलिस स्टेशनने कोणती कारवाई केली हे थेट पोलिस अधीक्षकांना कळणार आहे. तक्रार व कारवाई संदीर्भात पोलिस अधिक्षक नियमीत आढावाही घेणार आहेत. नागरीकांना वेबसाईटवर महिला, मुले, गुन्हे विषयक तक्रार, आर्थिक फसवणुकीची तक्रार, सायबर तक्रार, संपतीविषयी तक्रार, मोबाईल हरविल्याची तक्रार, सायबर फसवणुक झाल्याची तक्रार तसेच भाडेकरुची माहिती व ईतर तक्रारी करण्याची सुविधा नागरीकांसाठी या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

जिल्हा पोलिस दल नागरीकांच्या समस्या व तक्रारींचे निरसन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. नागरिकांना त्रास होऊ नये, पोलिस दलाविषयी अद्यावत माहिती व्हावी यासाठी गोंदिया जिल्हा पोलिस दलाची वेबसाईट कार्यान्वित केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या पोलिस दलाविषयी अद्ययावत माहिती व ऑनलाईन तक्रार व तक्रारीचे  या साईटवर पोलिस दलाच्या माहितीसह अधिकार्‍याचे संपर्क क्रमांक, तक्रारी, नकाशा, नविन कायदे यासंदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी वेबसाईटचा जास्तीत जास्त वापर करून तक्रारींचे निरसन करून घ्यावे. –गोरख भामरे, जिल्हा पोलिस अधिक्षक, गोंदिया.

Share